केस गळती व केस पांढरे होऊ नये यासाठी
केस गळती व केस पांढरे होऊ नये यासाठी तुम्ही बरेच प्रयत्न केले असतील सुद्धा पण तुम्हाला याचा काही फायदा झाला का जर नसेल तर खालील सर्व माहिती आवश्य वापरून बघा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल व कमी खरचत घरगुती पद्धतीने आपलय केसांचे आरोग्य चांगले ठेवाल तर चला पाहूया
१. कडीपत्ता
कडीपत्ता सकाळी उठल्यावर कडीपत्त्याची ३ ते ५ पाने तोंडात पूर्ण पाणी होई पर्यंत चघळा व नंतर ते गिळून टाका . कडिपत्त्यामध्ये बीटी केरोटीन व अमिनो ऍसिड असतात यामुळे केस गळती थांबते. रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन ते सकाळी उठल्यावर प्या आणि लगेच कडीपत्ता खा . त्यानंतर ३० मिनिटे काही खाऊ नका
२. ताक
ताकामध्ये प्रोटेनचे प्रमाण जास्त असते सकाळी अंघोळ करण्याच्या अगोदर ३० मिनिटे ताकाने केसांची चांगली मालिश करा व नंतर चांगल्या ऑयर्वेदिक शाम्पूने केस स्वच्छ धुवा . गरम पाणी वापरू नका कारण गरम पाणी सरळ डोक्यावर घेतल्याने केसांची मुळे कमजोर होतात व केस गळतात
३. आवळा चूर्ण
आवळा चूर्ण अर्धा चमचा घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा मध घालून रात्री जेवून २ तासांनी घ्या व नंतर काही घेऊ नका . या वरील प्रमाणे तुम्ही केसांची काळजी घेतल्यावर तुमचे केस गळणे थांबेल व केस पांढरे होणेयापसून वाचतील
संकलन : मनोज पाटील पुणे hodshilms@gmail.com




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा